संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गोदामाला आग

कोट्यवधी रुपयांचे धान्य जळून खाक
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गोदामाला आग

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या वखार महामंडळाच्या गोदामाला काल रात्री 9 वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत गोदामात ठेवलेले कोट्यवधी रुपयांचे धान्य जळून खाक झाले आहे, सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही.

बाजार समितीच्या आवारात असणार्‍या या गोदामांमध्ये शेतकर्‍यांचे धान्य, कापूस साठवून ठेवण्यात येतो. काल रात्री या गोदामाला अचानक आग लागल्याने गोदामातील सर्व धान्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच संगमनेर नगरपालिका, थोरात साखर कारखाना, विखे साखर कारखाना, अकोले कारखाना यांचे अग्निशामक दल बोलावण्यात आले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला या आगीची माहिती समजताच शहरातील तरुण मोठ्या संख्येने या गोदामात जवळ आले. उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आलेली नव्हती.

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे गोदाम पूर्णपणे जळून गेले गोदामाचा अर्धा भाग कोसळला होता या ठिकाणी तरुणांनी मोठी गर्दी केल्याने ही गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

वृत्त समजताच प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांचेसह पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर व बाजार समितीचे सचिव सतीष गुंजाळ व अन्य अधिकारी घटनास्थळी हजर असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी बघ्यांचीही मोठी गर्दी होत असल्याने यंत्रणेला अधिक काळजी घ्यावी लागत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com