<p><strong>राहाता | Rahata </strong></p><p>राहाता तालुक्यातील राजुरी येथे महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.</p>.<p>याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहाता तालुक्यातील राजुरी येथे महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने राजुरीसह परिसरात खळबळ उडाली आहे. या अज्ञात महिलेची हत्या करून मृतदेह जाळला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटना स्थळी लोणी पोलीस दाखल झाले असून महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलीसांचे प्रयत्न सुरू केले आहे. तसेच डाॅग स्काॅडच्या मदतीने आरोपींना शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरु केला आहे.</p>