अधिकार्‍याच्या मर्जीतील ‘त्या’ कर्मचार्‍याकडून कैद्यांचीही आर्थिक लूट

अधिकार्‍याच्या मर्जीतील ‘त्या’ कर्मचार्‍याकडून कैद्यांचीही आर्थिक लूट

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

संगमनेर शहर पोलीस ठाण्यामधील एक पोलीस कर्मचारी सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. पोलीस अधिकार्‍यांच्या मर्जीतील या कर्मचार्‍याने गेल्या काही दिवसापासून कैद्यांकडूनही आर्थिक लूट चालवली असल्याचे समजते.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गेल्या काही वर्षांपासून हा पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी तो डी बी मध्ये काम करत होता. यानंतर त्यांची बदली अन्य ठिकाणी करण्यात आली. मोठा प्रयत्न करूनही त्याला अपेक्षित टेबल मिंळत नव्हता मात्र तत्कालीन पोलीस निरीक्षक यांची बदली झाल्यानंतर त्याने नवीन आलेल्या अधिकार्‍याशी चांगले संबंध प्रस्थापित करून अपेक्षित टेबल मिळविला. या ठिकाणी काम करताना त्याने आपल्या पदाचा आणि अधिकार्‍यांसोबत असलेल्या संबंधचा पुरेपूर फायदा उठवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्याने कैद्यांची आर्थिक लूट चालवली आहे. करोनाबाधित कैद्यांची भेट घेऊन तुला उपचारासाठी नगरला हलवावे लागेल, तुझ्यावर संगमनेरात उपचार करता येणार नाही असे सांगून तो कैदी व त्यांच्या नातेवाइकाकडून पैशाची लूट करत आहे. 5 ते 10 हजार रुपये पर्यंत पैशांची मागणी तो करत असल्याचे समजते. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कठोर स्वभावाचे पोलीस अधिकारी कार्यरत असतानाही हा कर्मचारी कैद्यांची आर्थिक लूट कशी करू शकतो याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे.

हा कर्मचारी करोना रुग्णांची अडवणूक करत आहे तर सामान्य कैद्याशी तो कसा वागत असेल त्याच्या वागण्याकडे पोलीस अधिकारी दुर्लक्ष का करत आहे? करोना रुग्णांची तहसील कार्यालय, डॉक्टर कडूनही अडवणूक होत नसताना हा कर्मचारी मात्र अडवणूक करत आहे. त्याच्याविरुद्ध कारवाई होणार की नाही असा सवाल अनेक जण विचारत आहे. या कर्मचार्‍यांची त्वरित या ठिकाणावरून बदली करावी अशी मागणी होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com