
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
एल अँण्ड टी फायनान्स कंपनीचा पाथर्डी तालुक्याचा वसुली अधिकार्यावर कंपनीची 12 लाख 57 हजार 960 रूपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
विक्की पोपट भोसले (रा.कासारवाडी, तिसगाव, ता. पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित वसुली अधिकार्याचे नाव आहे. तक्रारीनुसार एल अँण्ड टी फायनान्स कंपनी ही गृह कर्ज, ट्रॅक्टर कर्ज, व कर्ज गरजू लोकांना उपलब्ध करून देते. 90 दिवसाच्या आतील नियमित आणि थकीत झालेल्या कर्जाच्या हप्त्याची वसुली करण्याचे कामकाज वसुली अधिकारी काम करीत असतात. विक्की पोपट भोसले हा पाथर्डी विभागामध्ये कर्ज वसुलीचे काम करण्याची जबादारी फायनान्स कंपनीने त्याच्याकडे सोपवली होती.
याचा त्यांनी गैरफायदा घेऊन फायनान्स कंपनीचे वीस खातेदारांची 1 ते 22 डिसेंबर 2022 दरम्यानची कर्ज वसुली करून त्यातील जमा झालेले एकुण रक्कम 12 लाख 57 हजार 960 रुपये घेऊन कर्जदारांना फायनान्स कंपनीच्या केलेक्शन अप्लिकेशन च्या माध्यामातुन पावत्या दिल्या. मात्र घेतलेले पैसे फायनान्स कंपनीमध्ये भरणा न करता रकमेचा अपहार केला आहे.
त्यानंतर कंपनीने भोसले विरुद्ध चौकशी अहवाल तयार करून तो दोषी असल्याने त्यास 23 डिसेंर 2022 रोजी कामावरून काढून टाकले आहे. असे फिर्यादीत म्हटलं असून याबाबात फायनान्स कंपनीचे वरिष्ठ वसुली अधिकारी विलास बाविस्कर यांनी पाथर्डी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.