अखेर इंदोरीत करोनाचा शिरकाव !
सार्वमत

अखेर इंदोरीत करोनाचा शिरकाव !

बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची धाबे दणाणले

Nilesh Jadhav

इंदुरी | वार्ताहर |induri

अकोले तालुक्यातील इंदुरीतही करोनाने शिरकाव केला आहे. आज 3 व्यक्ती करोना बाधीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे तिघे जणांच्या संपर्कात आलेल्यांची ही धाबे दणाणले आहे.

काल दुपारच्या सुमारास इंदूरी येथील एका 45 वर्षीय रूग्णास थंडी तापाचा त्रास होत असल्याने त्याची खाजगी प्रयोगशाळेत चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यास खानापूर येथील कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. बाधित रुग्ण हा गावातील मध्यवस्तीतील असल्याने करोना कमिटीने हा परिसर कंटेनमेंट म्हणून घोषित केला आहे. तसेच इंदोरी फाट्यावरील एका पती-पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे इंदुरीमध्ये बधितांची संख्या तीन झाली आहे. आरोग्य विभाग, करोना कमिटीने पाहणी करून ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत विविध सूचना केल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com