अकोले नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल

अकोले नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल

अकोले | प्रतिनिधी

अकोले नगरपंचायतचे (Akole Nagarpanchayat) अध्यक्षपद सर्वसाधारण व्यक्तीसाठी खुले आहे. नगरपंचायत निवडणूकीतील भाजपचे (BJP) १२ सदस्य विजयी झाले आहेत, त्यामुळे नगराध्यक्षपद भाजपलाच मिळणार हे स्पष्ट होते.

यापदासाठी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे आणि भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी (Sonali Naikwadi) यांच्या नावाची चर्चा होती. हे दोन्हीही नगरसेवक दुसऱ्यांदा निवडून आले आहे.

अकोले नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल
Lata Mangeshkar : लता दीदींना जेवणातून दिलं गेलं विष, तीन महिने सुरु होते उपचार

प्रारंभी भाजप पक्ष कार्यालयात माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड, पक्ष निरीक्षक व भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन ऍड.दिनकर, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीराम डेरे यांनी पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या सदस्यांची मते जाणून घेतली तसेच पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली.

अकोले नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल
शेतकऱ्याच्या खात्यात १५ लाख आले, तो म्हणाला मोदीजी धन्यवाद अन् बांधलं स्वप्नातलं घर आणि मग...

त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी सोनालीताई नाईकवाडी यांची उमेदवारी जाहीर केली. त्याप्रमाणे सौ.नाईकवाडी यांनी अकोले नगरपंचायतमध्ये जाऊन मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांचे कडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बाळासाहेब वडजे हे सूचक व हितेश कुंभार हे अनुमोदक आहेत.

यावेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, ऍड वसंतराव मनकर, जिप अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, अ. ता. एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष जे डी आंबरे, सचिव यशवंतराव आभाळे, पं स सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्तात्रय देशमुख, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, माजी जि प उपाध्यक्ष सिताराम देशमुख,बाजार समितीचे माजी सभापती सुधाकरराव देशमुख, पक्षाचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे , भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख ,शहराध्यक्ष सचिन शेटे, आदी उपस्थित होते.

अकोले नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल
'डिजिटल' आणि 'क्रिप्टो'करन्सीमधील फरक काय?, वाचा...

नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीने चार जागा जिंकलेल्या आहेत. आघाडी तर्फ शिवसेनेचे नगरसेवक नवनाथ शेटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे आरिफ शेख हे त्यांना सूचक तर श्वेताली रुपवते या अनुमोदक आहेत. आजच दुपारी अर्जाची छाननी होणार आहे. त्यानंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट होईल.

अकोले नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल
Mouni Roy : मौनी रॉयच्या शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो बघितले का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com