दारू पिऊन घरासमोर आरडाओरड नेवाशातील एकावर गुन्हा दाखल

दारू पिऊन घरासमोर आरडाओरड नेवाशातील एकावर गुन्हा दाखल

नेवासा |तालुका वार्ताहर|Newasa

नेवासा खुर्द येथील संभाजीनगर परिसरातील काळुबाई मंदिरासमोर दारू पिऊन इसम आरडाओरडा करून सामाजिक शांततेचा भंग करणार्‍या एका इसमाला नेवासा पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून कारवाई केली.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल रवी गोविंद पवार यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, शांताबाई सदाशिव लोखंडे रा. संभाजीनगर नेवासा खुर्द हिने फोनवरून तिचा पती तिला व तिच्या मुलांना मारहाण करत आहे असे कळविले. मी, हवालदार टी.बी. गीते, कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ तिथे गेलो असता आरडाओरड करत असलेला इसम सदाशिव महादेव लोखंडे (वय 52) रा. संभाजीनगर नेवासा खुर्द यास ताब्यात घेतले.

त्याची नेवासाफाटा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता तो मद्यार्काच्या अमलाखाली होता, असे लेखी प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिले. त्यानंतर सदर इसमावर नेवासा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अ‍ॅक्ट कलम 85 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन कारवाई करण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com