संस्थाचालका विरोधात विनयभंगाच्या गुन्हा दाखल
सार्वमत

संस्थाचालका विरोधात विनयभंगाच्या गुन्हा दाखल

प्रशिक्षण काळातही विनयभंग केल्याचा महिलेचा आरोप

Nilesh Jadhav

देवळाली प्रवरा | वार्ताहर | Devolali Pravara

देवळाली प्रवरा येथील पोलिस भर्तीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या एका संस्था चालका विरोधात नाशिकरोड येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, घर पाहण्याचा बहाणा करून महिला पोलीसाच्या स्वयंपाक घरात जाऊन अंगलट करण्याचा प्रयत्न केल्याने महिलेने आरडाओरड केली. सदर महिलेच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संस्था चालकाने प्रशिक्षण काळातही विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com