ग्रामसेवकाला शिवीगाळ व धमकी प्रकरणी गुन्हा दाखल

ग्रामसेवकाला शिवीगाळ व धमकी प्रकरणी गुन्हा दाखल

अकोले (प्रतिनिधी) / Akole - अकोले तालुक्यातील केळी ओतूर येथील ग्रामसेवक रवींद्र सहादू ताजणे व त्यांचे कार्यालयीन सहकारी यांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम करत असताना अरुण गोपीनाथ वालघडे (रा. केळी ओतूर, ता. अकोले) यांनी नळपट्टीचे थकीत पैसे भरणार नाही, तुला काय करायचे ते करून घे, अशी भुमिका घेत शासकीय कामात अडथळा आणुन दमदाटी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अकोले पोलिसांत ग्रामसेवक रवींद्र सहादू ताजणे यांनी फिर्याद दिली असून यात म्हटले आहे, दि. 7 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वा. फिर्यादी ग्रामसेवक व त्यांचे कार्यालयीन सहकारी हे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शासकीय काम करत असताना आरोपी अरुण गोपीनाथ वालघडे यांनी नळपट्टीचे थकीत बिल भरण्याच्या कारणावरून ग्रामपंचायत कार्यालयात येऊन मी नळपट्टीचे थकित पैसे भरणार नाही. तुला काय करायचे ते करून घे, असे म्हणून फिर्यादीस वाईट साईट शिवीगाळ व दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादी करत असलेल्या शासकीय कर्तव्यामध्ये जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीवरून अकोले पोलीस स्टेशन ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 241/2021 भारतीय दंड संहिता कलम 353, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साबळे करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com