आई-वडिलाचा सांभाळ न करता काढले घराबाहेर

दोन मुले, सुनांसह पाच जणांविरूध्द गुन्हा
आई-वडिलाचा सांभाळ न करता काढले घराबाहेर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आई-वडिलांचा सांभाळ न करता त्यांना घराच्या बाहेर काढल्याप्रकरणी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांच्या मुलांसह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. 9 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून 22 ऑगस्ट रोजी नारायण शंकर कार्ले (वय 72 रा. शाहूनगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मोठा मुलगा किशोर नारायण कार्ले, सून उषा किशोर कार्ले, लहान मुलगा रमेश नारायण कार्ले, सून कोमल रमेश कार्ले (सर्व रा. शाहूनगर, केडगाव) व उषाचा भाऊ संतोष उर्फ भाऊ संजय निवडुंगे (रा. भोईरे गांगर्डे ता. पारनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी हे मोठा मुलगा किशोर तर त्यांची पत्नी चंद्रकला ही लहान मुलगा रमेश यांच्याकडे राहत होती. 9 ऑगस्ट, 2022 रोजी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला दोन्ही मुले, सूना व संतोष निवडुंगे यांनी शिवीगाळ, दमदाटी करून घराच्या बाहेर काढून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com