खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन केंद्राविरुद्ध गुन्हा दाखल

खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन केंद्राविरुद्ध गुन्हा दाखल

जामखेड (तालुका प्रतिनिधी)

अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने दुधामध्ये भेसळ करणाऱ्या जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन व शितकरण केंद्र या पेढी विरुद्ध बारामती पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली .

अन्न व औषध प्रशासनाने ८ जुलै २०२१ रोजी शिवकृपा दूध संकलन शितकरण केंद्र, खर्डा ता. जामखेड, जि. अहमदनगर येथून टँकर क्रमांक एम एच ११-ए एल ५९६२ मधून बारामती येथे गाय दुधाचा नमुना विश्लेषणासाठी घेवून भेसळीच्या संशयावरून उर्वरित साठा सुमारे ८ हजार लिटर नष्ट केले. बारामती पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अर्जुन भुजबळ व संजय नारागुडे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे, शुभांगी अंकुश तसेच जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाचे पर्यवेक्षक राजेंद्र कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गाय दुधाचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये डिर्टजंट व ग्लुकोजची भेसळ आढळून आल्याने या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी कर्णे यांनी बारामती ग्रामीण पोलिस स्थानक येथे २१ सप्टेंबर २०२१ रोजी वैभव दत्तात्रय जमकावळे व संपत भगवान ननवरे यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मा. कायदा २००६ मधील कलमांचे उल्लंघन केले असल्याने प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) दिला आहे. दोंघाणाही ताब्यात घेण्यात आले असुन त्यांना अटक करण्यात आली दोंघाना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक महेश विधाते हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.