वाकडी येथे शेतीच्या बांधावरुन हाणामारी

परस्परविरोधी फिर्यादींवरुन गुन्हे दाखल
वाकडी येथे शेतीच्या बांधावरुन हाणामारी

नेवासा (तालुका प्रतिनिधी) - नेवासा तालुक्यातील वाकडी येथे शेतजमिनीच्या कारणावरुन हाणामारीची घटना घडली असून याबाबत दोन्ही बाजूच्या परस्परविरोधी फिर्यादींवरुन हाणामारी, धमकी चे गुन्हे दाखल झाले आहेत. तर एका बाजूच्या फिर्यादीवरुन दुसर्‍या बाजूच्या व्यक्तीवर असभ्य वर्तनाचा तर दुसर्‍या बाजूच्या फिर्यादीवरुन अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील वाकडी येथे शेतजमिनीच्या बाधांववरुन हाणामारीची घटना घडली. यात एका बाजूच्या महिलेच्या फिर्यादीवरुन एकावर असभ्य वर्तन, मारहाण व शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसर्‍या बाजूच्या फिर्यादीवरुन सदर महिलेसह तिच्या पतीवर मारहाण, शिवीगाळ तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com