दोन तलाठ्यांमध्येच तुंबळ हाणामारी

कुठे घडली घटना?
दोन तलाठ्यांमध्येच तुंबळ हाणामारी

संगमनेर | शहर प्रतिनिधी

अशिक्षित, असंस्कृत माणसांमध्ये हाणामाऱ्या शिवीगाळ अनेकदा होत असतात. मात्र सुशिक्षित आणि तेही सरकारी कर्मचारी यांच्यात हाणामारीच्या घटना क्वचितच घडतात.

संगमनेर तहसील कार्यालयात (sangamner tehsil office) काल दुपारी चक्क दोन तलाठ्यांमध्येच जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. एक तलाठी वारंवार करत असलेल्या चेष्टा यामुळे संतप्त झालेल्या दुसऱ्या तलाठ्याने त्याला चांगलीच अद्दल घडवली.

संगमनेर शहरात कार्यरत असलेला एक तलाठी तालुक्यातील एका गावातील दुसऱ्या तलाठ्याची कायम चेष्टा करून त्याला वाईट वागणूक देत होता. काल दुपारी योगायोगाने या दोन्ही तलाठ्यांची गाठ तहसील कार्यालयात झाली. यातील एका तलाठ्याला नेहमीप्रमाणे चेष्टा करण्याचा मोह आवरला नाही.

त्याने हिणकस भाषेत दुसऱ्यांदा त्याची चेष्टा सुरू केली. यामुळे संतापलेल्या तलाठ्याने या तलाठ्याची चांगलीच धुलाई केली. तहसील कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला या हाणामारीची माहिती समजताच त्याने मध्यस्थी करून हा वाद मिटवला.

दरम्यान तहसीलदारांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी दोन्ही तलाठ्यांना जाब विचारत काहीवेळ वेगळ्या खोलीत बसविले. दोन तलाठ्याची मारामारी झाल्याने हा शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com