पाळीव कुत्रा चावल्यावरून दोन गटात हाणामारी

पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हे
पाळीव कुत्रा चावल्यावरून दोन गटात हाणामारी

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

पाळीव कुत्रा चावल्याच्या (Dog Bite) रागातून दोन गटात हाणामारी (Two Group Fight) झाल्याची घटना ख्रिस्तगल्ली परिसरात घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रिया गणेश तिलानी (वय 32 रा. ख्रिस्तगल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकेश मुथीयान याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिया तोलानी यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की बुधवारी सकाळी फिरण्यासाठी जात असताना आरोपी मुथीयान याच्या पाळीव कुत्र्याने (Dog) मला चावा (Bite) घेतला. याबाबत पती आणि सासरे यांना सांगितल्यानंतर ते जाब विचारायला गेले असता आरोपी मुथीयान यांनी शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केली.

मुकेश दगडुलाल मुथीयान (वय 60 रा. खिस्तगल्ली) यांच्या फिर्यादीवरून कन्हैय्या तोलानी, गणेश कन्हैय्या तोलानी, हर्षा तोलानी आणि रिया गणेश तोलानी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश मुथीयान यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, राहत्या घराखाली असलेल्या दुकानाचे शटर उघडुन पायरीवर बसलेलो असताना कन्हैय्या तोलानी, गणेश तोलानी, हर्षा तोलानी आणि रिया तोलानी यांनी तुम्ही पाळलेल्या कुत्र्याने चावले, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच बुक्क्यांनी तोंडावर मारत तेथे असलेली वीट पाठीत मारली, पेव्हरब्लॉक हातावर मारत जिवे मारण्याची धमकी दिली.

Related Stories

No stories found.