हरेगाव येथेे दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

परस्परविरोधी फिर्यादी; सात जणांवर गुन्हा दाखल
हरेगाव येथेे दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - जुन्या भांडणाच्या कारणावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना आज घडली. याप्रकरणी दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरीन तालुका पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील हरेगाव येथील पंडित आणि बोधक कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी किरण राजू बोधक (वय 34, धंदा-रिक्षाचालक, रा. डी कॉर्टर, हरेगाव) यांनी पहिली फिर्याद दिली. आरोपी काईन विठ्ठल पंडित (रा. डी. कॉर्टर, हरेगाव) याने फिर्यादीचा भाऊ राहुल याला डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळील पाण्याच्या टाकीवर पाणी भरत असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी आरोपीकडे गेले. ते आरोपीला समजून सांगू लागले. त्याचा राग आरोपी पंडित याला आला. त्याने तेथे पडलेली वीट उचलुन फिर्यादी किरण याच्या कानाला व हाताला मारली. तसेच फिर्यादीच्या उजव्या हातावर चावा घेतला. असे फिर्यादी म्हटले आहे. त्यारून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 122/2021 भादवि कलम 325, 323, 337, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर काईन विठ्ठल पंडित (वय 47, धंदा-शेती, रा. हरेगाव आऊटसाईड) यांनी दुसरी फिर्याद दिली आहे. मागील भांडणाच्या कारणावरून आरोपी किरण राजू बोधक, राजू एकनाथ बोधक, प्रभाकर साळवे व इतर तीन व्यक्तींनी मिळून फिर्यादी पंडित यांना लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादी पंडित यांची मुलगी सुहानी हिला देखील मारहाण करून शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून गुन्हा रजिस्टर नंबर 123/ 2021 भादवि कलम 143, 147, 149, 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्री. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक श्रीमती गायकवाड या दोन्ही गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com