एकलहरे शिवारात दोन कुटुंबात हाणामारी

श्रीरामपूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी विनयभंगाचे गुन्हे दाखल
एकलहरे शिवारात दोन कुटुंबात हाणामारी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील एकलहरे गावातील जवाहरवाडी भागात एकाच शेत जमिनीवर दोन कुटुंबांनी दावा सांगितल्याने किरकोळ वाद होवून शिवीगाळ झाली. त्याचे पर्यासन हाणामारीत झाले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी विनयभंगाचे गुुन्हा दाखल करण्यात आले आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे गावातील जवाहरवाडी भागात एकाच शेत जमिनीवर दोन कुटुंबांनी दावा सांगितल्याने दोन्ही बाजूने प्रत्येकी दहा ते बारा लोक जमा झाले. यामध्ये दोन्ही कुटुंबातील महिलांचा देखील समावेश होता.

सुरुवातीला किरकोळ वाद होऊन शिवीगाळ झाली. तुम्ही लय माजलेत, तुमची मस्ती जिरवतो, तुम्हाला जिवंत ठेवणार नाही असे दोन्ही बाजुने शाब्दिक वाद झाले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांत जोरदार हाणामारी झाली. ज्यामध्ये दोन्ही कुटुंबातील महिलांच्या अंगावर येऊन, कपडे फाडून विनयभंग झाल्याची घटना घडली आहे.

तरी दोन कुटुंबात झालेल्या या राड्याबाबत पहिल्या कुटुंबाच्या फिर्यादी नुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 291/2021 भादवि कलम 143,147,354अ,354 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसर्‍या कुटुंबाने दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा रजिस्टर नंबर 292/ 2021 कलम 143, 147,354,354 अ,354 ब, वगैरे प्रमाणे गुन्हा काल रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.

यातील एका गुन्ह्यातील फिर्यादी हा श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर एक भागातील रहिवासी आहे तर दुसरा हा शिर्डी भागातील आहे. या दोन्ही कुटुंबांनी ज्या जमिनीवर दावा सांगितला ती जमीन एकलहरे गावातील आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक श्री. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. घायवट हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com