दोन गटात तुंबळ हाणामारी; १६ जणांवर गुन्हे दाखल
सार्वमत

दोन गटात तुंबळ हाणामारी; १६ जणांवर गुन्हे दाखल

पारनेर तालुक्यातील घटना

Nilesh Jadhav

सुपा | वार्ताहार | Supa

पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे रस्त्यावर काट्याचा फास टाकून रस्ता अडवला या कारणाने दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटांनी एकमेका विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. एकूण १६ जणांवर पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दोन्ही गटावर पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉन्स्टेबल एस ही लोणारे, पोलिस नाईक एस. व्ही. गुजर हे करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com