अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली असून बँकेवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार

गटाचा झेंडा फडकला आहे. आता चेअरमन निवडीचा विषय पुढे आला असून या ठिकाणी संधी मिळावी, यासाठी इच्छुकांकडून फिल्डींग लावण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे चेअरमन पदाची माळ थोरात की पवार समर्थकाच्या गळ्यात पडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

गत पंचवार्षिकला सीताराम गायकर यांच्या रुपाने राष्ट्रवादीच्या ताब्यात अधिकाअधिक काळ चेअरमन पद राहिलेले आहे. मात्र, त्याकाळात झालेल्या निर्णयावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी वडीलकीच्या नात्यावर बोट ठेवत थोरात यांचे बँकेच्या कारभारावर लक्ष नसल्याची नाराजी व्यक्त केली होती. यामुळे बँकेला आर्थिक शिस्त लावण्यासोबत नव्या जुन्यांचा मेळ घातल, ज्येष्ठ आणि तरूण यांच्या हाती बँकेचा कारभार सोपविला जातो की अन्य काही प्रयोग होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ज्या प्रमाणे सहमतीची एक्सप्रेस धावली त्याच धर्तीवर आता चेअरमन, व्हाईस चेअमन पदाची निवडी राहणार का? हे पाहवे लागणार आहे. यामुळे इच्छुकांनी आतापासूनच बँकेच्या चेअमरन पदासाठी फिल्डींग लावली असून त्या ठिकाणी कोणाला संधी मिळणार यासाठी काही काळ वाट पाहवी लागणार आहे.

निवडीचा कार्यक्रम

संचालक मंडळाच्या निवडीनंतर चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्याकडून स्वतंत्र कार्यक्रम येईल, त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी चेअरमन, व्हाईस चेअरमन पदासाठी स्वतंत्र मिटींग बोलावतील आणि संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन, व्हाईस चेअरमन यांची निवड करण्यात येईल, बँक प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.