ऐन सणासुदीच्या काळात चोरटे सक्रीय

एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या: नागरिकांमध्ये खबराट
ऐन सणासुदीच्या काळात चोरटे सक्रीय

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर, उपनगरात ऐन सणासुदीच्या काळात चोर्‍या (Thieves), घरफोड्या (Burglary), बॅग चोरी ( Bag Theft), सोनसाखळी चोरीच्या (Gold Chain Theft) घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोमवारी रात्री, मंगळवारी पहाटे शहरातील कोतवाली (Kotwali), तोफखाना पोलीस ठाणे (Topkhana Police Station) हद्दीत तीन ठिकाणी घरफोडीच्या (Burglary) घटना घडल्या. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, वाढत्या चोरी, घरफोडी, सोनसाखळी व बॅग चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये खबराट पसरली आहे. मात्र चोरट्यांना अटक (Arrested) करण्यात शहर पोलिसांना अपयश आले आहे.

गेल्या महिनाभरात पैशाच्या बॅग चोरीला (Theft of Money Bags) गेल्याच्या तीन घटना घडल्या. चोरी (Thieves), घरफोडी (Burglary), सोनसाखळी चोरीचे प्रकार दररोज सुरू आहे. सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी पहाटे तोफखाना (Topkhana) व कोतवाली पोलीस ठाणे (Kotwali Police Station) हद्दीत घरफोडीच्या तीन घटना घडल्या. तपोवन रोडवरील सुर्यनगरच्या साईकृपा अपार्टमेंटमध्ये किसन एकनाथ लवांडे (वय 72) यांचे घरफोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे, रोख रक्कम, चांदीची भांडी बरोबरच अमेरिकन डॉलरसह एक लाख नऊ हजार 500 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी लवांडे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घरफोडीची दुसरी घटना बालिकाश्रम रोडवर घडली.

या रोडवरील आकाश बिअर शॉप चोरट्यांनी फोडली. तेथुन रोख रक्कम व बिअरचे कॅन असा 64 हजार 160 रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सोमवारी रात्री 10 ते मंगळवारी पहाटे साडेपाच या वेळेत ही घटना घडली. याप्रकरणी बंडु बाबुराव लेंडकर (रा. लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील बुरूडगाव रोडवरील इंपेरिअल चौकातील बॉम्बे चिकन शॉप फोडून 18 हजार रूपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी शेख गुलाम हबीब खलील अहमद (रा. सर्जेपुरा) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com