सण, उत्सवाच्या वर्गणी विरोधात एकवटले नगरचे डॉक्टर्स

पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे इंडियन मेडिकल असोसिएशनची तक्रार
सण, उत्सवाच्या वर्गणी विरोधात एकवटले नगरचे डॉक्टर्स

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरात सण, उत्सवाच्या नावाखाली वर्गणी गोळा करणार्‍या राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि अन्य यांच्या त्रासाला डॉक्टर, रुग्णालय चालक-मालक कंटाळे आहेत. सण, उत्सवाच्या नावाखाली वर्गणी देण्यास नगरच्या डॉक्टरांनी विरोध केला असून अशा प्रकारे मागण्यात येणार्‍या वर्गणीवर बंदी घालावी, अशी मागणी रविवारी नगरच्या इंडियन मेडिकल असोसिएशन पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.

रविवारी नगर शहर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री विखे पाटील यांची भेट घेवून आपली कैफियत मांडली. नगर शहरात प्रत्येक महिन्यांत सण आणि उत्सव सुरू आहेत. या सण उत्सवाच्या नावाखाली राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि अन्य वर्गणी मागण्यासाठी येतात.

पालकमंत्री विखे पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, नगर शहरात इंडियन मेडिकल असोसिएशनचे 600 सभासद असून बहुतेकांचे खासगी हॉस्पिटल आहेत. दररोज सण उत्सव असतांना आणि नसतांना देखील कोणीना कोणी छोटी-मोठी वर्गणीच्या रक्कमेची मागणी करण्यासाठी येतात. तसेच वर्गणी न दिल्यास कार्यकर्त्यांमार्फत हॉस्पिटल आणि डॉक्टरांना त्रास देण्यात येत आहे.

यामुळे अनावश्यक डॉक्टरांना मानसिक त्रासाला समोरे जावे लागते. यामुळे सण, उत्सवाच्या वर्गणीबाबत आचारसंहिता तयार करावी, अन्यथा ही पध्दत पूर्णपणे बंद करावी, यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचा पाठपुरवा सुरू असल्याचे सांगण्यात आले. यावेळी डॉ. सतिष सोनवणे, डॉ. मिलींद पोळ, डॉ. सचिन पांडूळे यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच या पुढे मुंबई नर्सिंग होत अतंर्गत देण्यात येणार्‍या परवाना हा दहा वर्षाचा असावा, अग्निशमन विभाग परवानगी, प्रर्दुषण विभाग परवानगी व इतर सर्व परवानगीसाठी शासनाने एक खिडकी योजना सुरू करावी, अशी मागणी देखील यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com