उत्सवात वाद घालणारांना महिनाभर तालुकाबंदी

कर्जत पोलीसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई
उत्सवात वाद घालणारांना महिनाभर तालुकाबंदी

कर्जत |प्रतिनिधी| Karanji

तालुक्यातील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गोंधळ घालून व समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असे वर्तन करून तसेच वारंवार मारहाणीसारखे प्रकार करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा गुन्हा करणार्‍यावर कर्जत पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. अशा संशयतांना कर्जत तालुक्यातून महिनाभराच्या कालावधीसाठी प्रवेश बंदी करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

स्वप्नील उर्फ सनी राजेंद्र पवार (रा. कर्जत) असे प्रवेशबंदी करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्यासह इतर काही संशयितही पोलीसांच्या रडावर आहेत. पवार याने राशीन येथे सार्वजनिक शिवजयंती मिरवणुक सुरू असताना एकास मारहाण करून दुखापत केली होती 14 एप्रिल रोजीही आरोपीने कर्जत शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मिरवणुक सुरू असताना वाद घातला होतो. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तालुक्याच्या हद्दीत 2 महिने प्रवेश बंदीबाबत आदेश करण्याची विनंती उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यास उपविभागीय दंडाधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी मान्यता देऊन सबंधीतांना तालुक्यात प्रवेश करण्यास बंदी घातल्याचा आदेश दिला आहे.

Related Stories

No stories found.