बंदुकीचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील सोने लुटले

बंदुकीचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील सोने लुटले

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील सुरेगाव येथील महिला मुलासमवेत अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून नाशिकडून घरी येत असताना शहाजापूर हद्दीत पंचाळे रोडवर मळी तलावाजवळ आरोपी संदीप मुळेकर रा. मोतीनगर सुरेगाव व आणखी एक आरोपी यांनी बंदुकीचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील 1 लाख 11 हजार किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याबाबत सविता अशोक धनगर, रा. मोतीनगर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दखल केला आहे.

सविता अशोक धनगर व त्यांचा मुलगा बुधवारी सायंकाळी 5 वाजता नाशिकवरून काम आटोपून दुचाकी वाहनावरून सुरेगावकडे येत असताना त्यांना आरोपी संदीप मुळेकर व त्याचा सहकारी यांनी वरील ठिकाणी अडवले व सविता धनगर यांच्या गळ्यातील एक लाख 11 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटून नेले आहेत. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सविता धनगर यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिसांनी गु.र.क्रं.317/ 2022 भा. दं. वि. 392, 349, 34, आर्म अ‍ॅक्ट 3/25 अन्वये दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पो.नि.दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार धाकराव करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com