कोयत्याचा धाक दाखवून वाहन चालकांना लुटले

दीड लाखांचा ऐवज लांबविला; दोघांविरूध्द गुन्हा
कोयत्याचा धाक दाखवून वाहन चालकांना लुटले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोयत्याचा धाक दाखवून दोन वाहन चालकांना लुटल्याची घटना रविवारी पहाटे निंबळक बायपास ते मनमाड जाणार्‍या रोडवर एचपी पेट्रोलपंपासमोर घडली. सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एक लाख 34 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

या प्रकरणी झुंबर रामभाऊ भोसले (वय 53 रा. खराडी, चंदननगर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीवरून आलेल्या अनोळखी दोघांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास झुंबर भोसले व महेश मते यांची वाहने आडवून दोघांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखविला.

झुंबर भोसले यांच्या खिशातील एक लाख रूपयांची रोकड, पाच ग्रॅमची अंगठी, महेश मते यांच्या खिशातील 10 हजार रूपयांची रोकड व दोन ग्रॅमचा ओम असा एक लाख 34 हजार रूपयांचा मुद्देमाल काढून घेतला. भोसले यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती देत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चाहेर करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com