...अन्यथा नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवू - बागवान

...अन्यथा नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवू - बागवान

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आगामी नगरपालिका निवडणुकीत ज्या पक्ष अथवा मंडळाकडून संधी मिळेल त्यांनाच आम्ही साथ देऊ, अन्यथा आम्ही स्वतंत्र लढूू, असे प्रतिपादन ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनयझेशनचे जिल्हाध्यक्ष फय्याज बागवान यांनी केले. ऑर्गनयझेशनच्या पदाधिकार्‍यांना बक्कर कसाब जमात खाना येथे नियुक्तीपत्रे देण्यात आल्यानंतर ते बोलत होते.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा समन्वयक जाफर शाह अध्यक्षस्थानी होते. आरीफ कुरेशी, जाकीर शाह, अजीज अत्तार, फय्याज मुलानी, इकबाल काकर, इब्राहीम बागवान आदींना यावेळी पत्रकार शफीक बागवान आणि फय्याज बागवान यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.

यावेळी जाफर शाह, पापा आतार यांची भाषणे झाली. कार्यक्रमास बक्कर कसाब जमातचे अध्यक्ष युनूसभाई कुरेशी, तोफीक शाह, जुनेद काकर, शकील शेख, युनूस कुरेशी, जाकीर बागवान, फिरोज शेख, इरफान शाह, आवेज शाह, इलीयास कुरेशी, राजू कुरेशी, कलीम आतार, आरीफ काकर, पापा आतार आदी उपस्थित होते. इकबाल काकर यांनी सूत्रसंचालन केले तर पापा आतार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com