फत्त्याबाद ते चांडेवाडी या रस्त्याची तहसीलदार पाटील यांच्याकडून पाहणी

फत्त्याबाद ते चांडेवाडी या रस्त्याची तहसीलदार पाटील यांच्याकडून पाहणी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील फत्त्याबाद ते चांडेवाडी रस्त्याची तहसीलदार प्रशांत पाटील यांनी नुकतीच पाहणी करुन रस्त्याच्या कडेला तातडीने मुरूम टाकण्याची सूचना ग्रामसेवक श्री. ओहोळ यांना केली.

फत्त्याबाद ते चांदेवाडी रोडवर सकाळी दोन ते तीन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार पाटील यांनी रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्यावर मुरूम टाकण्याच्या सूचना दिल्या.

तालुक्यातील फत्त्याबाद ते चांडेवाडी रोडची दुरवस्था झाल्याने तातडीने मुरूम टाकण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. या भागातील शेतकरी दोन वर्षांपासून रस्त्याच्या कामाची मागणी करत आहेत. या कामासंदर्भात चौकशी केली असता फत्त्याबाद ते चांडेवाडी रस्त्याच्या कामासाठी चाळीस लाख रुपये निधी आलेला आहे, असे असताना आत्तापर्यंत रस्त्याचे काम झाले नाही.

शिंदे व आठरेवस्ती नजिक रस्त्यात पावसापावसाचे अथवा अन्य कारणांनी पाणी साचून पाण्याचे तळे व चिखल होतो. पाऊस चालू झाल्यापासून आत्तापर्यंत चार अपघात झाले, फत्त्याबाद ते चांडेवाडी रस्ता अत्यंत खराब झाला आहे. पाऊस सुरू असल्यामुळे हा रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत, असे ज्येष्ठ शेतकर्‍यांनी तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी तहसीलदार पाटील यांनी रस्त्याची पाहणी करून ग्रामसेवकांना या रस्त्यावर मुरूम टाकण्याची सूचना केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com