धक्कादायक ! बापानेच दोन बालकांना फेकले विहिरीत

धक्कादायक ! बापानेच दोन बालकांना फेकले विहिरीत

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील आळसुंदे (Alsunde) गावामध्ये नराधम बापाने (Father) दोन लहान मुलांना विहिरी फेकून दिले (Two Small Children Were Thrown into the Well). यामध्ये त्या दोन्हीही बालकांचा दुर्दैवी मृत्यू Child Death) झाल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे. गोकुळ जयराम शिरसागर (38, रा. आळसुंदे, ता. कर्जत) असे संशयिताचे नाव आहे. यामध्ये त्याची दोन लहान मुले यामध्ये ऋतुजा (8 वर्ष) ही इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी मुलगी व वेदांत (4 वर्ष) यांचा मृत्यू (Death) झाला आहे.

धक्कादायक ! बापानेच दोन बालकांना फेकले विहिरीत
पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरसागर याने घरापासून सहाशे मीटर अंतरावर असणार्‍या विहिरीकडे (Well) दोन्ही मुलांना उचलून पाण्यामध्ये फेकून दिले. पाण्यामध्ये फेकून देताच काही वेळात या दोन्ही बालकांचा बुडून मृत्यू (Death) झाला. यानंतर या नराधम बापाने आपण या दोन मुलांना विहिरीमध्ये फेकून दिले आहे. अशी माहिती गावातील नातेवाईकांना सांगितली. तात्काळ सर्व ग्रामस्थ घटनास्थळी धावत गेले तसेच पोलिसांना देखील याबाबत माहिती देण्यात आली. पोलीस ग्रामस्थ या सर्वांनी तात्काळ त्या दोन्हीही बालकांना पाण्याच्या बाहेर काढले. त्यांना तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे आणले.

धक्कादायक ! बापानेच दोन बालकांना फेकले विहिरीत
धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य

मात्र तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू (Death) झाल्याचे डॉक्टरांनी दोन्ही बालकांना तपासून घोषीत केले. दरम्यान कर्जत पोलिसांनी नराधम बाप गोकुळ शिरसागर यास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान हा प्रकार शिरसागर याच्या दारूचे व्यसन व घरघुती भांडणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी (Police) व्यक्त केला आहे.

धक्कादायक ! बापानेच दोन बालकांना फेकले विहिरीत
अपघातग्रस्त ट्रकमध्ये आढळला पाच लाखाचा गुटखा
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com