मुलाने बेदम मारहाण करत केला वडिलांचा खून

चौघांवर गुन्हा दाखल
मुलाने बेदम मारहाण करत केला वडिलांचा खून

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

एका गुन्ह्यात पोलीसांनी मुलास पकडल्यानंतर यास वडिलांना दोषी ठरवत बेदम मारहाण केली. यात वडिलांचा मृत्यु झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील भांबोरा शिवारातील कोरेवस्ती येथे घडली. या प्रकरणी पोलीसांनी संशयितास जेरबंद केले आहे. त्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन उर्फ आस्मानतार्‍या सुलाख्या चव्हाण, अक्काबाई चव्हाण, काळ्या चव्हाण, विशाल चव्हाण (रा. सर्व कोरेवस्ती, भांबोरा, ता. कर्जत) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तर यात त्याचे वडिल सुलाख्या चव्हाण यांचा मृत्यु झाला आहे. या प्रकरणी चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन चव्हाण याचा मुलगा समीर याला दौंड, जिल्हा पुणे येथील पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली आहे. त्यास वडिल सुलाख्या चव्हाण व भाऊ राजु चव्हाण यांनीच पकडून दिले असा संशय घेऊन नितीन चव्हाण, त्याची पत्नी व दोन मुलांनी वडिल व भावाला मारहाण केली. ते पळून जात असताना नितीन याने दगड फेकून मारला तो राजूच्या डोक्यात लागून तो जखमी झाला. त्यानंतर त्याने वडिल सुलाख्या चव्हाण यांना पाठीमागून डोक्यात काठी मारली. यामुळे ते खाली कोसळले.

तर इतर संशयितांनी बेदम मारहाण केली. यात सुलाख्या चव्हाण हे बेशुद्ध पडले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना भांबोरा व पुढे दुसर्‍या दिवशी सकाळी भिगवण व दोन दिवसांनी पुण्यातील ससुन रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मालोका राजू चव्हाण हिच्या फिर्याद वरून कर्जत पोलिसांनी चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस जवान अंकुश ढवळे, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, गोवर्धन कदम, शकील बेग, राणी व्यवहारे आदींनी ही कामगिरी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com