दारू पिण्यास पैसे न दिल्याने जन्मदात्या पित्याचा खून; आरोपी मुलास अटक

दारू पिण्यास पैसे न दिल्याने जन्मदात्या पित्याचा खून; आरोपी मुलास अटक

शिर्डी | प्रतिनिधी

दारू पिण्याकरिता पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या पित्याचा मुलाने खून केल्याची घटना जवळके येथे नुकतीच घडली असून खून केलेल्या आरोपीस पोलिसांनी तात्काळ अटक असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. .

या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शिर्डी लगत असलेल्या कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे सुदेश सखाहारी थोरात (वय ५०) व वडील सखाहारी चंदू थोरात (वय ८०) हे एकत्र राहत होते. २३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणामुळे मुलगा सुदेश यांने वडिल सखाहारी यांना लाकडी दांडक्याने डोक्यावर व पायावर हातावर जबरी मारहाण करून गंभीर जखमी केले.

सदरची घटना २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर याची माहिती कोणाला न देता जखमीला तसेच घरात ठेवून पळून गेला व सकाळी आपल्या वडिलांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मारहाण केली आहे. असा बनाव करून शेजारील लोकांना माहिती दिली. शेजारील नागरिकांनी तात्काळ सखाहारी थोरात यांना साईबाबा संस्थान हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याने.

या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयित सुदेश थोरात यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने या खुनाची कबुली दिली.

सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सुरेश यास अटक केली असून त्याच्यावर भादवी ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यास कोपरगाव न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने आरोपीस पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com