नवविवाहितेला सासर्‍याने छेडले

उपनगरातील घटना; कोतवालीत गुन्हा
नवविवाहितेला सासर्‍याने छेडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नवविवाहितेसोबत सासर्‍याने गैरवर्तन केल्याची घटना नगर शहरातील एका उपनगरात घडली. याप्रकरणी पीडित विवाहितेने बुधवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सासर्‍याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

19 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. फिर्यादीचे आठ दिवसांपूर्वीच लग्न झाले आहे. 19 सप्टेंबर रोजी फिर्यादी राहत्या घरी असताना सासर्‍याने त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच फिर्यादी बेडरूममध्ये केस विचरत असताना सासरा पुन्हा त्यांच्या जवळ आला. त्याने फिर्यादीसोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून विनयभंग केला. सदरची घटना कोणाला सांगू नको म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित विवाहितेने बुधवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात येत सासर्‍याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बाबासाहेब इखे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com