जमीन नावावर करण्यासाठी बाप-लेकाला मारहाण

मांजरसुंबा येथील घटना : एकाविरूध्द गुन्हा
जमीन नावावर करण्यासाठी बाप-लेकाला मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जमीन नावावर करण्यासाठी एकाने बाप-लेकाला लोखंडी अँगलने मारहाण केली. या मारहाणीत लहानु परसराम कदम (रा. मांजरसुंबा ता. नगर) हे जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी मांजरसुंबा येथील आपले सेवा केंद्रासमोर ही घटना घडली. याप्रकरणी बुधवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप लहानु कदम (वय 25 रा. मांजरसुंबा) यांनी फिर्याद दिली आहे.

गोरक्षनाथ परसराम कदम (रा. लक्ष्मी चौक, मांजरसुंबा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी फिर्यादी व त्यांचे वडिल त्यांच्या आपले सेवा केंद्रासमोर उभे होते. त्यावेळी गोरक्षनाथ कदम तेथे आला व तो फिर्यादीला म्हणाला,‘तुझे आजोबा यांनी तुझ्या नावावर केलेली जमीन माझे नावावर का नाही करत’, असे म्हणून फिर्यादी व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ, दमदाटी केली. लोखंडी अँगलने फिर्यादीचे वडिलांना पोटावर, डोक्याला व पाठीवर मारहाण करून जखमी केले. फिर्यादीसही लोखंडी अँगलने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक संदीप आव्हाड करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com