आरोपी पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावर जीवघेणा हल्ला

नगर तालुक्यातील घटना: सात जणांवर गुन्हा
आरोपी पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावर जीवघेणा हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पसार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावर सात जणांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात नगर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी भरत बाजीराव धुमाळ हे जखमी झाले असून त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. नगर तालुक्यातील कारगाव चौकात ही घटना घडली.

जखमी धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हल्ला करणारे रमेश सावत्या भोसले, तुषार सावत्या भोसले, आत्मशा सावत्या भोसले, सावत्या भोसले, अविनाश ऊर्फ सुरशा भोसले, शेरीना रमेश भोसले व एक अनोळखी (सर्व रा. पिंपळगाव कौंडा ता. नगर) यांच्यावर खूनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हवालदार धुमाळ हे पसार आरोपी रमेश भोसले याला अटक करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे असलेल्या सात जणांनी धुमाळ यांना पकडून लाकडी दांडके, दगड, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. धुमाळ यांच्या दुचाकीचे नुकसान केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com