श्रीगोंदा : भरारी पथकाद्वारे सोळा खत दुकानाची तपासणी
सार्वमत

श्रीगोंदा : भरारी पथकाद्वारे सोळा खत दुकानाची तपासणी

पाच दुकानांना विक्री बंदचे आदेश

Arvind Arkhade

श्रीगोंदा|प्रतिनिधी|Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यात 18 व 19 जुलै रोजी सोळा कृषी सेवा केंद्राची भरारी पथकांकडून अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान विविध बाबींची तपासणी केल्यानंतर 16 पैकी 5 विक्रेत्यांना विक्री बंद करण्याचे आदेश तर 10 विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून 2 विक्रेत्यांची परवाना रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या आदेशानुसार कृषि विकास अधिकारी सुनिलकुमार राठी व जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी दिपक पानपाटील, तालुका कृषि अधिकारी पद्मनाभ म्हस्के, कृषि अधिकारी पंचायत समिती डॉ. राम जगताप, कृषि अधिकारी अमजद तांबोळी व मंडळ कृषि अधिकारी शितल आरु मॅडम यांच्या पथकाद्वारा श्रीगोंदा, विसापूर व हिरडगाव येथे ही कार्यवाही करण्यात आली आहे.

युरियाची तालुक्यातील टंचाई , खत दुकानात अनियमितता यासह अन्य कारणामुळे तालुक्यातील खते विक्री दुकानाबाबत आलेल्या तक्रारी यामुळे तपासणी करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com