कृषी पदवीधरांसह शेतकर्‍यांचे आ. राधाकृष्ण विखेंना साकडे

अमेरिकन कंपनी विरोधात कारवाईची मागणी
कृषी पदवीधरांसह शेतकर्‍यांचे आ. राधाकृष्ण विखेंना साकडे
आ. राधाकृष्ण विखे पाटील

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राज्यातील 100 हून कृषी पदवीधरांचे थकीत पगार (Painding salaries of agricultural graduates) देण्यास नकार देऊन 350 हून अधिक कृषी सेवा केंद्रचालकांना (Agricultural Service Center Owner) कोट्यवधी रुपयांना गंडविणार्‍या व अमेरिकन कंपनी (American company) असल्याचे सांगून शेतकर्‍यांची लुबाडणूक करणार्‍या कंपनीच्या गैरव्यवहारात आता राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील (Former Leader of Opposition of the State MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी लक्ष घातले आहे. कंपनीचे पितळ उघडे पाडणार्‍या कृषी पदवीधरांवर खोटे गुन्हे दाखल (False charges filed against agricultural graduates) केल्यानंतर आ. विखे यांची शेतकरी व कृषी पदवीधरांनी समक्ष भेट घेऊन त्यांच्यासमोर कंपनीविरूद्ध तक्रारींचा पाढा वाचला.

दरम्यान, आ. विखे पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत थेट विचारणा केली असून याप्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत.

अनुभवी कृषी पदवीधरांची नेमणूक केल्यानंतर कंपनीच्या काही चालकांनी अमेरिकेच्या एका व्यक्तीबरोबर फेसबुकवर मैत्री करून त्याला या घोटाळ्यात सामील करून घेतले आहे. यातून राज्यातील सुमारे 400 कृषी सेवा केंद्रचालक, 25 हजार शेतकरी यांना अमेरिकेची कंपनी असल्याचे सांगून किटकनाशक औषधे देऊन सुमारे 25 कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. मात्र, औषधांच्या पॅकींगवरून कर्मचार्‍यांना शंका आल्याने शेतकरी, कर्मचारी व कृषी सेवा केंद्रचालकांनी कंपनीकडे ही औषधे भारतीय बनावटीची असल्याचा कांगावा केला. त्यावर कंपनीचालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अनेक कर्मचार्‍यांनी एकापाठोपाठ राजीनामा सत्र सुरू केले.

त्यावर कंपनीचालकांनी कर्मचार्‍यांना पोलिसी कारवाईचा धाक दाखविण्यात आला. गेल्या दीड वर्षापासून शेतकरी आणि कृषी सेवा केंद्रचालकांच्या तक्रारी वाढल्याने व कर्मचार्‍यांना वेतन न मिळाल्याने कर्मचार्‍यांनी दि. 26 जानेवारीपासून एल्गार पुकारला आहे. कर्मचार्‍यांनी कंपनी विरोधात कृषीमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse), पोलीस आयुक्त, सेवा कर विभाग, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), कृषी आयुक्त, यांच्यासह थेट पंतप्रधानांकडे (PM) तक्रारी दाखल केल्या आहेत. तर आ. विखे पाटील यांचीही भेट घेऊन त्यांना याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. याप्रकरणी संबंधित कंपनीचालक व पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, कर्मचार्‍यांवर राहाता व शिर्डी येथे गुन्हे दाखल करण्यात आल्यानंत्तर पोलिसांनी कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांवरही दहशत पसरविली असल्याची माहिती कमर्र्चार्‍यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com