शेतकर्‍यांना व्हॉटस्अ‍ॅपवर मिळतोय हवामान अंदाज व कृषीसल्ला

शेतकर्‍यांना व्हॉटस्अ‍ॅपवर मिळतोय हवामान अंदाज व कृषीसल्ला

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी तालुकानिहाय हवामान आधारित कृषीसल्ला दिला जातो. मागील वर्षापासून हवामानाची माहिती थेट शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हवामान आधारित कृषीसल्ला व्हॉट्सअ‍ॅपद्वारे देण्यात येतो, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्पाच्या कृषी विद्या विभागातील प्रमुखांनी दिली.

सध्या दिल्या जात असलेल्या हवामान आधारित कृषी सल्ल्यामध्ये मागील सात दिवसांच्या हवामानाची आकडेवारी दिली जाते. तसेच पुढील पाच दिवसांचा सविस्तर हवामानाचा अंदाज आणि हवामान आधारित पीकनिहाय कृषी सल्ला देण्यात येतो. दैनंदिन शेतीचे नियोजन करताना हवामान आधारित कृषीसल्ला शेतकर्‍यांना उपयुक्त ठरतो. त्यामुळे हवामान आधारित कृषीसल्ला मिळविण्याकरीता शेतकर्‍यांनी 8421012185 या क्रमांकावर फक्त आपल्या तालुक्याचे नावे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मेसेज करावा.

तदनंतर त्या शेतकर्‍यास तालुक्याच्या ग्रुपमध्ये समाविष्ठ करून त्यांना तालुक्याकरिताचा हवामान आधारित कृषीसल्ला नियमित प्राप्त होईल. हा कृषीसल्ला सुरूवातील नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांकरीता असून इतर जिल्ह्यातील शेतकर्‍यांकरीता काही दिवसात त्या-त्या जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी संपर्क साधणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍याना विनंती करण्यात येते, तालुकानिहाय सविस्तर हवामान आधारित कृषीसल्ला मिळविण्याकरीता त्वरित 8421012185 या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, अशी माहिती ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्पाच्या प्रमुखांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com