नेवासा (तालुका प्रतिनिधी) -

महावितरणच्या घोडेगाव उपविभागात शेती पंपांची 295 कोटी रूपयांची वीजबिल थकबाकी असून त्यातील 102 कोटी थकबाकी महावितरणकडे

त्वरीत भरणे अत्यावश्यक आहे. शेतीपंप ग्राहकांनी मुळ मुद्दल भरल्यास 50 टक्के रक्कम माफ होणार असल्याने या विभागातील शेतीपंप ग्राहकांना महावितरणाच्या कृषी धोरणाचा लाभ घ्यावा तसेच वीज बील भरण्यासाठी ग्रामपंचायतींनी कृषी ग्राहकांना प्रोत्साहित करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणचे घोडेगाव विभागाचे उपअभियंता श्री. बडे यांनी केली.

तेलकुडगाव येथे उपअभियंता श्री. बडे यांनी कृषीपंप ग्राहक, ग्रामस्थ व शेतकरी वर्गाशी संवाद साधत कृषीपंप वीज धोरणाची माहिती दिली. हे धोरण कृषीपंप ग्राहकांना कसे फायदयाचे आहे याचीही कल्पनाही दिली.

बडे म्हणाले, घोडेगाव विभागात 294 कोटी 76 लाख रूपये थकबाकीतील 102 कोटी 15 लाख रूपये रक्कम भरणे गरजेचे आहे. शेतीपंप ग्राहकांना 100 टक्के व्याज व दंडही माफ करण्यात आलेला आहे. एकूणच या विभागातील शेतीपंप ग्राहकांना 192 कोटी 61 लाख रूपयांचा फायदा या कृषी धोरणानुसार होणार आहे. सहायक अभियंता श्री. मराठे उपस्थित होते.

शेतीपंप ग्राहकांकडून वसूल झालेल्या रकमेतील 33 टक्के रक्कम संबंधीत ग्रामपंचायतींकरीता मंजूरी देण्याचे अधिकार महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांस देण्यात आलेले आहेत. तर जिल्हा स्तरावर ग्रामपंचायतींकडून एकत्रितपणे वसूल झालेल्या रकमेच्या 33 टक्के रक्कमेपर्यंतचे मंजूरीचे अधिकार पालकमंत्री, महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यास देण्यात आल्याने या कृषी धोरणासाठी ग्रामपंचायतींचाही पुढाकार महत्वाचा ठरणार आहे.