शेतकर्‍यांसाठी खेळते भांडवल योजना पुन्हा सुरू

माजी मंत्री कर्डिले: करोना संकटकाळात शेतकर्‍यांना मदत होणार
शेतकर्‍यांसाठी खेळते भांडवल योजना पुन्हा सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना संकट काळामध्ये शेतकर्‍यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून खेळते भांडवलरूपाने

नगर तालुक्यातील शेतकर्‍यांना सुमारे 129 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. या कर्ज वाटपाची चर्चा होऊन टीकाटीप्पणी करण्यात झाली. मात्र शेतकर्‍यांनी प्रामाणिकपणे मार्च अखेर सुमारे 116 कोटी रुपये भरले आहे. उर्वरित 13 कोटी रुपयांची वसुली जून अखेर होईल. शेतकर्‍यांना खेळते भांडवलची योजना दोन ते चार महिने वापरता आल्यामुळे पुन्हा ही योजना सुरू केली असून करोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिली.

तालुक्यातील शेतकर्‍यांना जिल्हा बँकेच्यावतीने प्राथमिक स्वरूपात खेळते भांडवल कर्ज वाटपाचा शुभारंभ माजी मंत्री कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के, माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, नगर तालुका विकास अधिकारी आनंदराव शेळके, शाखा अधिकारी महादेव कराळे, संजय भुतकर उपस्थित होते. माजी मंत्री कर्डिले म्हणाले, करोना संकट काळामध्ये शेतकर्‍यांना आर्थिक मदत होणे गरजेचे असल्यामुळे जिल्हा बँकेने पुन्हा दुसर्‍या वर्षी खेळते भांडवल कर्ज वाटप सुरू केले.

31 मार्चला घेतलेले कर्ज भरण्याची मुदत संपत असल्यामुळे शेतकर्‍यांना केंद्र सरकारच्या सबसिडीचा लाभ मिळणार आहे. यावर्षीही सबसिडीचा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. शेतकर्‍यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरल्यामुळे बँकेचे कर्तव्य समजून पुन्हा खेळते भांडवल योजना सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com