शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी केलेले कायदे तातडीने रद्द करावेत, या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील

तळेगाव दिघे येथे काँग्रेस पक्षातर्फे स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेस काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दसर्‍याच्या दिवशी प्रारंभ करण्यात आला.

शेतकरी व कामगार विरोधी केलेले काळे कायदे केंद्र सरकारने तातडीने रद्द करावेत, या मागणीसाठी काँग्रेस पक्षातर्फे दोन कोटी स्वाक्षरी माहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत संगमनेर तालुक्यात एक लाख स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. तळेगाव दिघे येथेही शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दसर्‍याच्या दिवशी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली.

प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील, सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच रमेश दिघे, नामदेव दिघे, मधुकर दिघे, तात्यासाहेब दिघे, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे, अनिल कांदळकर, तळेगाव सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम दिघे, काँग्रेस सेवादल प्रदेश कृषी समिती अध्यक्ष कचरू पाटील पवार, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे, उपाध्यक्ष नजीर शेख, भास्कर खेमनर, बाळासाहेब दिघे, निलेश दिघे, भाऊसाहेब दिघे, यशवंत कांदळकर, आत्माराम जगताप, इसाक शेख, सोपान दिघे उपस्थित होते. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते दत्तात्रय वाघ यांना काँग्रेस सेवादल जिल्हा संघटकपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी काही शेतकर्‍यांनी केली. त्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारला कर्ज काढावे लागणार आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले अशा शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी आपली व सरकारची भूमिका आहे. त्यासाठीच पिकांचे पंचनामे केले जात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com