शेतकर्‍यांचे विविध प्रश्न तातडीने सोडवा

श्रमिक शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी
शेतकर्‍यांचे विविध प्रश्न तातडीने सोडवा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेल्या नुकसानीची तातडीने सरसकट नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन श्रमिक शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले.

यावेळी दिलेल्या निवेदनात अतिवृष्टी, पूर यामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई ही सरसकट देण्यात यावी, उ2+50 टक्के नफा धरून पिकांना हमीभाव द्यावा, शेतकर्‍यांचे वीज बिल माफ करावे, लम्पि आजारामुळे बाधित व मृत्यू झालेल्या पशुधनाची भरीव नुकसान भरपाई द्यावी, वीज बिल कायदा 2020 तात्काळ मागे घ्यावा आदी मागण्यांसह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. तसेच शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासन करीत असलेल्या दुर्लक्षामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सदर मागण्यांची तातडीने सोडवणूक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा श्रमिक शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी श्रमिक शेतकरी संघटनेचे राजाध्यक्ष कॉ. राजेंद्र बावके, कॉ. बाळासाहेब सुरूडे, कॉ. गुजाबा लकडे, कॉ. राजेंद्र मुसमाडे, कॉ. प्रकाश भांड, कॉ.उत्तम माळी, कॉ. जीवन सुरूडे, कॉ. शरद संसारे, कॉ. मदिना शेख, कॉ. अनिल बोरसे, कॉ.श्रीकृष्ण बडाख, कॉ. नानासाहेब तारडे, रामेश्वर जाधव, कॉ.अरुण बर्डे, भानुदास पागीरे, दत्तात्रय माळी, कालिदास हांडे, प्रकाश पवार, बाळासाहेब वाणी आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com