शेतकर्‍यांच्या अडचणी त्वरीत सोडवा

अन्यथा तीव्र आंंदोलन करु || शेतकरी संघटनेचा इशारा || जिल्हा सहकारी बँक व्यवस्थापनाशी अ‍ॅड. काळे यांची चर्चा
शेतकर्‍यांच्या अडचणी त्वरीत सोडवा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जिल्हा सहकारी बँक व्यवस्थापनाच्या अटी शेतकर्‍यांना पिककर्जा संदर्भात बँकेकडून अडचणीच्या ठरत असून त्या पार्श्वभूमीवर रिझर्व बँक गाईड लाईन मुद्यावर जिल्हा शेतकरी संघटनेने या महत्वपूर्ण विषयावर चर्चा केली. व शेतकर्‍यांच्या अडचणी त्वरित सोडवाव्यात अन्यथा कायदेशीर मार्गाने संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला.

पीक कर्ज मागणी प्रश्नांसंदर्भात अहमदनगर जिल्हा सहकारी बँक व्यवस्थापन समितीसमवेत बैठक होवून यात शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन सिताराम गायकर यांच्यासमवेत महत्वपूर्ण विषयांवर चर्चा घडवून आणली. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, युवराज जगताप व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पती-पत्नी दोघांनाही 8-अ प्रमाणे स्वतंत्र पिककर्ज मिळावे. भोगवटादार वर्ग -2 ला विना जामिन पिककर्ज मिळावे. सोसायटी बेबाकी असलेल्या व इतर बँका थकबाकी असलेल्या सभासदांना पिककर्ज मिळावे यासह इतरही शेतकरी समस्येवर जिल्हा बँकेचे चेअरमन सिताराम गायकर यांच्या समवेत चर्चा झाली.

याप्रसंगी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते साहेबराव बाळासाहेब चोरमल, मच्छिंद्र केशव आव्हाड, गोरक्षनाथ रामदास पवार, अजगर उस्मान सय्यद, संजय बापूराव पवार, इंद्रभान बाळासाहेब चोरमल, अशोक दादासाहेब पवार, बच्चू बाबासाहेब मोढवे, नारायण पाटील टेकाळे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com