शहरटाकळी |वार्ताहर| Shahartakali

शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी (आंत्रे) येथील महावितरणकडून शेतकर्यांना शेतीपंपाचे वीज बिल भरण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

शुक्रवारी महावितरणच्या येथील सबस्टेशनच्या कर्मचारी यांनी शेतीचा वीजपुरवठा बंद केला होता.

शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा शहरटाकळी सेवा संस्थेचे चेअरमन अॅड.अनिल मडके, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र खंडागळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वाय.डी.कोल्हे, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य ढोरसडेचे माजी सरपंच गुरुनाथ माळवदे, सुभाष बरबडे, भगवानराव खरमाळे, आबासाहेब राऊत, राजेंद्र डोळे, मोहन खंडागळे, रामाप्पा गिरम, प्रशांत वेलदे, सुनील गवळी, दत्तात्रय लदेसह शेतकरी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन येथील सबस्टेशनवर शेतीपंपाचे बिल भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली. कनिष्ठ अभियंता पाडवी यांनी शेतकर्यांची मागणी मान्य करत तीन दिवस बिल भरण्यासाठी मुदत वाढवून दिली.

ऊस तोडीवर सर्वपक्षीय कार्यकर्ते गप्प?

वीजपुरवठा बंद होताच सर्वपक्षीय कार्यकते आणि शेतकरी यांनी महावितरण विरोधात एकत्र येत निवेदन देत तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्यास लावला. मात्र सर्वसामान्य शेतकर्यांच्या उसाला पंधरा महिने होऊनही तोड मिळत नसल्याने हे कार्यकर्ते गप्प ? याबाबत शेतकर्यांमधून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.