शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीकडे कल वाढवावा - चंद्रकांत दादा मोरे

शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीकडे कल वाढवावा - चंद्रकांत दादा मोरे

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

शेतकर्‍यांनी काळाची गरज ओळखून सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे. सेंदीय शेती हे सर्वोत्तम शेती असून त्यामुळे शेतकर्‍यांचा फायदाच आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीकडेे कल वाढवावा, असे आवाहन चंद्रकात दादा मोरे यांनी केले.

गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आदेशाने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत पुणतांबा श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक बाल विकास केंद्र येथे चंद्रकांत दादा यांचा प्रशासकीय दौरा व हितगूज कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमास मुक्ताई ज्ञानपीठाचे महंत रामशास्त्री महाराज यांनी स्वामी समर्थ सेवेकर्‍यांना मार्गदर्शन केले. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील हॉस्पिटल बांधणीसाठी काही देणगीदारांनी देणगी दिली. ‘दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. रामशास्त्री महाराजांचा सत्कार चंद्रकांत दादा यांनी केला.

आज भारतात व विदेशात 7000 पेक्षा जास्त केंद्र व 15 कोटी पेक्षा जास्त स्वामी समर्थ सेवेकरी आहे. आपल्या भारत देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा सेवेकर्‍यांची संख्या वाढत आहे. मोरे दादांनी हितगुज प्रसंगी सांगितले की, गुरुमाऊली म्हणजे आध्यात्मिक आई. स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकर्‍यांनी व्रतवैकल्य व सणवार कशी साजरी करावी याची मांडणी करत त्याची माहिती दादांनी दिली. संत श्री ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे दाखले दिले. घराघरात आज शिवबा व जिजाऊ जन्मास यावयास हव्या. तसेच पंचमहायज्ञाची माहिती दिली.

‘ज्याच्या दारी गाय त्याच्या दारी विठ्ठलाचे पाय’ याप्रमाणे गोमातापासून आपल्याला पंचामृत द्रव्य मिळत. गाव तेथे केंद्र व घर तिथे सेवेकरी याचा प्रसार व प्रचार सर्व सेवेकर्‍यांनी करावा, अशी विनंती केली. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुला-मुलींवर चांगले संस्कार करावे त्यामुळे सुसंस्कृत पिढी उदयास येईल. चिंतामुक्त आयुष्याला एकच औषध ते म्हणजे स्वामींच स्मरण. महिलावर्ग जास्त उपस्थित असल्यामुळे महिलांनी प्रत्येक स्वामी समर्थ केंद्राला आपले माहेर समजावे. सर्व शेतकरी बांधवांनी काळाची गरज ओळखून सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन परमपूज्य चंद्रकांत दादा मोरे यांनी केले.

पुढील महिन्यात गुरुमाऊली यांच्या हस्ते नरसोबाची वाडी या ठिकाणी 100 खाटांचे हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे त्याचे उद्घाटन गुरुमाऊलींच्या हस्ते होणार आहे.

पुणतांबा येथील कार्यक्रमाला शिर्डी, राहाता, रामपूरवाडी गणेशनगर, एकरूखे, चितळी, वाकडी येथील सेवेकरी उपस्थित होते. तसेच पुणतांबा येथील सरपंच डॉ. धनंजय धनवटे, सुहास वहाडणे, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन सुभाष वहाडणे, संदीप धनवटे, मनोज गुजराथी, स्वप्नील धनवटे, चंद्रकांत डोखे, प्रताप वहाडणे व स्वामी समर्थ केंद्रातील सर्व सेवेकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com