श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी पिकवणार चक्क गॅस

खानापूरला जैविक इंधन व सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प
श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी पिकवणार चक्क गॅस

नाऊर (वार्ताहर) - जीतशार प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, बायोफ्युएल कंपनी, शकुंतला क्लीनफ्युल्स प्रायव्हेट लिमिटेड व एम. सी. एल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 1 लक्ष किग्र, दररोज निर्मिती क्षमतेच्या बायो-सीएनजी प्रकल्प तालुक्यातील खानापूर येथे उभारला जात आहे. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी गॅस पिकविणार आहे.

तालुक्याच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीकोनातून या प्रकल्पाची स्वच्छ इंधन-बायोफ्युएल व मकॅन्सर मुक्त-केमिकल मुक्त सेंद्रिय शेती या दोन क्षेत्रांचा विकास या प्रकल्पाद्वारे करण्याचे तसेच शेतकर्‍यांनी इतर पिकासह गॅस देखील पिकविण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

सदर प्रकल्पामुळे संपुर्ण तालुक्याला इंधनामध्ये स्वयंपुर्ण करणार असून त्यामध्ये वाहतूकीचे इंधन (पेट्रोल, डिझेल, खनिज सीएनजी याला 100 टक्के पर्याय), स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन (एलपीजी ला पर्याय) व औद्योगिक क्षेत्रासाठी (डिझेलला पर्याय) लागणार्‍या आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या इंधनाची निर्मिती करणार असल्याचे एम.सी. एल कंपनीचे प्राईम बी. डी. ए. रंजीत दातीर यांनी सांगितले. या स्वच्छ इंधनामुळे आपला तालुका प्रदुषण मुक्त होण्यासाठी मोठी मदत होणार असून या प्रकल्पामुळे अंदाजित 2000 प्रत्यक्ष रोजगार व 1500 ते 2000 अप्रत्यक्ष रोजगार आपल्या तालुक्यात निर्माण होणार आहे.

डॉ. बबनराव आदिक म्हणाले, या प्रकल्पामुळे आपला तालुका, आपला परिसर सोडून नोकरीसाठी स्थलांतराची गरज राहणार नाही. व्यवसायाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक कुटुंबामध्ये शाश्‍वत व कायमचे असे कमीत कमी 5000 ते 10000 रुपये महिना उत्पन्न व्हावे हेच ध्येय आहे. तसेच आपल्या भागातील, तालुक्यातील शेतकर्‍यांच्या, मजुरांच्या, कामगारांच्या, पदवीधारक तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी आपण संघटित होण्याची गरज आहे. आपल्या तालुक्याच्या विकासासाठी कोणत्याही बाहेरच्या कंपनीची, संस्थेची वाट न पहाता आपणच जबाबदारी उचलायची असल्याचे मत डॉ. बबनराव आदिक व एम. सी. एल. चे बी. डी. ए. रंजीत दातीर यांनी मांडले.

याप्रसंगी डॉ. बबनराव आदिक, अंबादास आदिक, परशुराम आदिक, शशी किरण आदिक, ज्ञानदेव आदिक, शिक्षक श्री. बनकर आदी उपस्थित होते. करोनामुळे कार्यक्रम छोटा व मोजकेच शेतकरी यांच्या उपस्थित करण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com