ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हैराण

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हैराण

कोल्हार | वार्ताहर

गेल्या दोन-तीन दिवसापासून सूर्यदर्शन नाही. ढगाळ हवामानामुळे शेतीपिकांची हानी वाढली. दररोज पिकांच्या रोग प्रतिबंधात्मक फवारणीने शेतकरी बेजार झाले. शेतीखर्चात वाढ तर उत्पन्नात घट अशी विपरीत परिस्थिती निर्माण झाली. एकंदरित निसर्गाच्या दुष्टचक्राने कोल्हार भगवतीपूर परिसरातील बळीराजा चिंताक्रांत झाला आहे.

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हैराण
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ हवामानाचे आच्छादन पसरले. एकाएकी तापमान खाली आले. कमालीचा गारठा वाढला. सूर्यदर्शन लाभेना. याचे सर्वाधिक प्रतिकूल परिणाम कृषी क्षेत्रावर उमटले. ढगाळ आणि रोगट हवामानाचा रब्बीच्या पिकांवर प्रादूर्भाव होऊ लागला. कांदा पिकावर करपा रोग वाढला. तसेच गहू हरभरा, या पिकांवर मावा, बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे. ऊन नसल्यामुळे घासाच्या पिकाची पाने पिवळी पडू लागली. द्राक्ष बागांमध्ये दररोज महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. तीन दिवसांपूर्वी राहाता, श्रीरामपूर, नेवासा तालुक्यातील काही भागांमध्ये गारपीट झाली. सुदैवाने कोल्हार भगवतीपूर परिसरात गारपीट झाली नाही. अन्यथा मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागले असते.

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हैराण
भाग्यश्रीच्या मनमोहक अदांची चाहत्यांना पडली भुरळ, पाहा फोटो

यंदाच्या वर्षी वेळी-अवेळी पडलेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांसाठी कराव्या लागणाऱ्या शेतीच्या मशागती लांबणीवर गेल्या. त्यात भर म्हणून आता ढगाळ हवामानामुळे पिकांना प्रतिकूल वातावरणाचा सामना करावा लागत आहे. विचित्र आणि लहरी निसर्गाच्या फटक्याने शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र बिघडले. तरीही प्रयत्नांची पराकाष्टा सुरू ठेऊन शेतीपिके जगविण्याचा अहोरात्र ध्यास सुरू आहे.

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हैराण
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

सध्या राज्यात किमान १० ते १२ अंश सेल्सियस तापमान असणे म्हणजे शीतलहर सक्रिय असल्याचे सूचक आहे. तीन दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसाने हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढले. तापमानात अचानक घट झाली. सद्यस्थितीतील ढगाळ वातावरण उशिरा येणाऱ्या खरीप पीक, फळबाग, आंब्याचा मोहोर यासाठी नुकसानकारक आहे. त्याचप्रमाणे गहू, हरभरा आणि कांदा यासारख्या रब्बीपिकांमध्ये किडींचा प्रादूर्भाव वाढलेला दिसून येतो आहे. कांद्याला चांगला भाव सापडेल या अपेक्षेने यंदाच्या वर्षी परिसरात कांदा लागवड अधिक झाली. मात्र खराब वातावरणामुळे कांदा पिकामध्ये बुरशीचा प्रादूर्भाव वाढला आहे. थंड वातावरण असल्याने अन्नद्रव्य तयार होत नसल्याने ऊसासारख्या पिकांची वाढ थांबते. जनावरांच्या चारा पिकावर मावा, तुडतुडापडण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला. शेतीचे आर्थिक गणित बसविणे जिकरीचे बनत चालले आहे.

धनंजय दळे (प्रगतिशील शेतकरी तथा संचालक, विखे पा. साखर कारखाना)

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हैराण
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

सध्याचे ढगाळ हवामान आणि बेभरवशाचा अवकाळी पाऊस यांच्या सावटाखाली द्राक्ष उत्पादक मार्गक्रमण करीत आहेत. लाखो रुपये गुंतविलेले असल्याने जीव मुठीत घेऊन वाटचाल सुरु असते. द्रांक्षाला स्टेजेसनुसार वेगवेगळेपोषकद्रव्ये तसेच वाढीसाठी औषध फवारणी असते. मात्र सध्याच्या रोगट हवामानामुळे निव्वळ रोगप्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करावी लागते. द्राक्षबागांना सध्या दररोज दररोजचा औषध फवारणी खर्च ५ हजार रुपये इतका वाढला आहे. ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश मिळेना. पर्यायाने उत्पन्नात घट आणि द्रांक्षाची कॉलिटी (दर्जा) उतरण्याचा संभव वाढला. सूर्यप्रकाशाअभावी पिकाची वाढ खुंटतेच शिवाय द्रांक्षाच्या घडाचा व मण्याचा आकार कमी होतो. परिसरात कोल्हार बुद्रुक, भगवतीपूर, लोणी, बाभळेश्वर, राजुरी, ममदापूर, उक्कलगाव भागात मिळून अंदाजे ५०० एकर द्राक्ष पिकाचे क्षेत्र आहे. द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे.

बाळासाहेब उर्फ प्रभाकर खर्डे (द्राक्ष उत्पादक तथा विश्वस्त कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट)

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हैराण
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com