गुर्‍हाळ्याच्या प्रदूषणाने शेतकरी हैराण

गुर्‍हाळ्याच्या प्रदूषणाने शेतकरी हैराण
File Photo

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील तोंडोळी येथील सेवानगर तांडा येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या गुर्‍हाळाच्या प्रदूषणाने जवळील नागरिक तसेच शेतकरी हैराण झाले असून गुर्‍हाळ बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत शेतकरी महादेव रेवा राठोड यांनी गटविकास अधिकार्‍यांना निवेदन देण्यात दिले आहे.

यामध्ये म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून बाळू जाधव-वडते हा इसम तोंडोळी येथील गट क्रमांक 162 या सामायिक शेतजमिनीत अनधिकृतपणे गुर्‍हाळ चालवत आहे. सदर गुर्‍हाळाचा बॉयलर पेटविण्यासाठी बाळू जाधव हा उसाची ओली चोथरी जळावी म्हणून प्लॅस्टिकचा वापर करत असल्यामुळे त्यातून निघणार्‍या विषारी धुरामुळे सेवानगर तांड्याचे जनजीवन धोक्यात आले आहे.

महादेव राठोड यांची शेतीही याच गट क्रमांकात येत असून सदर गुर्‍हाळाच्या प्रदूषणामुळे तिची उत्पादन क्षमता कमालीची घटली आहे. प्रशासनाने मूग गिळल्याचे निदर्शनास आल्यानंतर महादेव राठोड यांनी सदर प्रशासनाच्या निषेधार्थ काळा झेंडा घेऊन सत्याग्रह करणार असल्याचा इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com