शेतकर्‍यांचे भाऊबंदकीचे वाद कायमचे मिटणार!

परिपत्रक जारी, अतिशय कमी खर्च व मुद्रांक शुल्कामध्ये जमिनीचे आदान-प्रदानाचे व्यवहार होणार
शेतकर्‍यांचे भाऊबंदकीचे वाद कायमचे मिटणार!

मुंबई, अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शासनाकडून एक नवीन योजना सुरु होणार आहे. ती योजना आहे सलोखा योजना. ही योजना शेतकर्‍यांच्या जमिनीशी निगडित आहे. या योजनेअंतर्गत जमिनींबाबतचे वाद, तंटे सोडण्यास मदत होणार आहे. म्हणजेच एका शेतकर्‍याची जमीन दुसर्‍या शेतकर्‍याच्या नावावर त्याची जमीन तिसर्‍या शेतकर्‍यांच्या नावावर, अशा प्रकारचे वाद व तंटे या सलोखा योजनेतून सुटू शकणार आहेत. त्यासाठीच शासनाने सलोखा योजनेचा निर्णय घेतला असून याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने काल जारी केले आहे.

तसेच अतिशय कमी खर्च व मुद्रांक शुल्कामध्ये जमिनीचे आदान-प्रदानाचे व्यवहार करता येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी परस्परविरोधी शेतकर्‍यांकडे जमिनींचा ताबा 12 वर्षांपासून असावा, अशी अट घालण्यात आली आहे.

ग्रामीण भागात शेतजमिनीच्या ताब्यावरून गावागावांत होणारे टोकाचे वाद आपण कायम पाहत असतो. हे वाद अनेक वर्षांपासून आपण अनुभवत असून याबाबतीत अनेक अशी प्रकरणे पोलीस, कोर्टात प्रलंबित आहेत. याच जमिनीच्या वादामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कोर्ट-कचेरीत फेर्‍या मारत आहेत. या जमिनीच्या वादांमुळे सख्खे भाऊही पक्के वैरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

आता शेतजमिनीच्या ताब्यावरून भाऊबंदकीतले वाद मिटवणार्‍या सलोखा योजनेस राज्य मंत्रिमंडळाने अखेर मान्यता दिली. यासाठी मुद्रांक शुल्क केवळ 1000 रुपये तर नोंदणी शुल्क 1000 रुपये आकारण्यात येणार आहे. शेतजमिनीच्या ताबा व वहिवाटीबाबत अनेक शेतकर्‍यांमध्ये आपापसात वाद मिटविण्यासाठी व सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी ही योजना अंमलात आणली जाणार आहे.

या सालोखा योजनेअंतर्गत शेतकर्‍यांनी अर्ज केल्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी 15 दिवसात पंचनामा करणे आवश्यक असल्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत .

या योजनेमुळे भाऊबंदकीचे वादात अडकलेल्या शेतकर्‍यांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होण्यास मदत होईल. तसेच विविध न्यायालयातील प्रकरणे देखील यामुळे निकाली निघतील. या योजनेमुळे भूमाफियांचा असलेला अनावश्यक हस्तक्षेप सुद्धा यामुळे टाळता येणार आहे.

नक्की काय आहे, सलोखा योजना ?

शेतजमिनीच्या ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकर्‍यांमध्ये आपापसांत वाद होतात. ते मिटविण्यासाठी आणि समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी सलोखा योजना आणण्यात आली आहे. या योजनेत एका शेतकर्‍याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसर्‍या शेतकर्‍याकडे आणि दुसर्‍या शेतकर्‍याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकर्‍याकडे असेल, तर अशा शेतजमीन धारकांचे दस्तांच्या अदलाबदलीसाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत दस्तनोंदणीच्या अदलाबदलीसाठी मुद्रांक शुल्क एक हजार रुपये आणि नोंदणी फी 100 रुपये आकारण्यात येईल. या योजनेमुळे शेतकर्‍यांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होईल. तसंच विविध न्यायालयातील प्रकरणं निकाली निघतील. भूमाफियांचा अनावश्यक हस्तक्षेप सुद्धा होणार नाही, असा सरकारला विश्वास आहे.

प्रश्न:-अर्जावर दोन्ही अदलाबदल द्त करू इच्छिणार्‍या खातेदांपैकी कमीत कमी किती जणांची सही आवश्यक आहे.

उत्तर:- कोणत्याही एका सज्ञान खातेदाराची सही असणे आवश्यक आहे.

प्रश्न:-गावातील तंटामुक्त समिती व उपविभागीय अधिकारी तथा इपविभागीय दंडाधिकारी यांची या योजनेत काय भूमिका असेल?

उत्तर :- क्षुल्लक कारणांवरुन मिटत असलेला वाद जर वाढत असेल तर दोन्ही पक्षकार तंटामुक्तीसमितीची किंवा अन्य कोणत्याही संस्थेची किंवा व्यक्तीची मदत घेऊ शकतात किंवागावातील वाद मिटत असतील तर या योजनेसंबंधाने तंटामुक्ती समिती स्वत:हून पक्षकारांनासंपर्क करुन संपूर्ण गावातील अशा प्रकारचे वाद मिटवण्याच्या दृष्टीने कोणावर अन्याय होणार नाही याबाबत चर्चा विनिमय करून प्रकरण सामोपचाराने मिटविण्यासाठी प्रयत्नकरतील. जेणेकरुन भविष्यात पक्षकारांचे वाद संपुष्टात येऊन गावात सलोखा, सौहार्द व शांतता कायम राहील. शासन निर्णयानुसार सदर सलोखा योजना यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांनी मुलभूत प्रयत्न करावयाचे आहेत. शेतजमीनीच्या परस्परविरोधी ताबे व मालकीबाबतच्या प्रकरणांचा त्या गावातील तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील व गाव तंटामुक्ती समिती यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधावा.तसेच दर पंधरा दिवसांनी योजनेच्या फलनिष्पत्तीबाबत व्यक्तिशः आढावा घ्यावा. अदलाबदल दस्ताव्दारे जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून गावातील सामाजिक सलोखा, सौहार्द व शांतता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत.

प्रश्न:- तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पंचानाम्यासाठी प्रत्यक्ष दोन्ही सर्व्हे नंबरचे ठिकाणी जाणे अत्यावश्यक आहे काय ?

उत्तर:-होय.

प्रश्न:-तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पंचानाम्यासाठी दोघांपैकी पंचनामा रजिस्टरवर एकाचीच सही चालेल का?

उत्तर:-नाही. पंचनामा रजिस्टरवर दोघांचीच सही लागेल.

प्रश्न:-मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागातील इतर योजनांना कमी कालावधी असतो. येथे मात्र दोन वर्षांचा कालावधी देण्याचे प्रयोजन काय ?

उत्तर:- ही योजना समाजातील अत्यंत संवेदनशिल विषय असलेल्या जमीनीच्या मालकीचा परस्परविरोधी ताबा याचेशी निगडीत आहे. सदर ताब्याबाबत पिढ्यांपिढ्याचा वाद असल्यानेअदलाबदल दस्त करण्यासाठी दोन्ही बाजूंचा संयम, मनोधैर्य, विश्वासार्हता,सामंजस्य,साहस व तडजोड वृत्ती इ. गुणांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे पक्षकार यांची मनेवळवणे व दस्त नोंदणीसाठी एकमत होणे ह्या गोष्टीला वेळ लागणार असल्याने यासाठीदोन वर्ष मुदत ठेवलेली आहे.

प्रश्न- पंचनामा नोंदवहीमध्ये चतुःसिंमाधारकांची सही आहे. परंतु, अदलाबदल करणारे

पक्षकार यांची सही आवश्यक आहे काय ?

उत्तर- आवश्यकता नाही. परंतु, ते हजर असतील तर सही करु शकतात. पक्षकारांची सही आवश्यक नाही. कारण त्यांचेपैकी एकाने अर्ज केला म्हणूनच पंचनामा होणार आहे. शिवाय अदला-बदल दस्त नोंदणीवेळी सर्व पक्षकारांची संमती असल्याशिवाय दस्त नोंदविला जाणार नाही.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com