मुळा डावा कालव्याचे पाणी अचानक बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष

पाणी वापर संस्था बरखास्त करण्याची मागणी
मुळा डावा कालव्याचे पाणी अचानक बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष

आरडगांव | वार्ताहर

मुळा डावा कालव्याचे पाणी पाटबंधारे विभागाने अचानक बंद केल्याने राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व पाणी वापर संस्थेच्या पदधिकाऱ्यानी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा निर्माण घेतल्याने या पाणी पाणी वापर संस्था बरखास्त करण्याची मागणी लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे.

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या प्रयत्नातून ९ जानेवारी रोजी रब्बी हंगामासाठी मुळा धरणातून डाव्या कालव्यात शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे होते. सदर आवर्तन आरडगाव, मानोरी, वळण या लाभधारक क्षेञात हे पाणी न सोडता तिळापूर, वांजुळपोई या लाभधारक परीसरात पुर्ण दाबाने हे पाणी वळविण्यात आले होते. माञ त्या परीसरात मुळा-प्रवारा या नद्यांचा संगम असल्याने पाण्याचा स्रोत बघता तेथील शेतीला अद्याप पाण्याची आवश्यकता नसल्याने तेथील परीस्थिती लक्षात घेता हे आवर्तन बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला.

माञ आरडगाव, मानोरी, वळण या लाभधारक क्षेञात ऊसाच्या तोडी बहुतांशी प्रमाणात झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी गहू, हरबारा, कांदा लागवडीसह रंब्बी हंगामातील पिके खोळंबली आहेत. त्यामुळे या परीसरात पाण्याची आवश्यकता असताना देखील हा कालवा पुर्णपणे बंद झाल्याने शेतीपीकांचे नुसकसान होत आहे. पाणी वापर संस्थेने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी निर्णय घेतल्याचा आरोप करत या पाणी वापर संस्था बरखास्त करण्याची मागणी मानोरी येथील शेतकरी संजय पोटे, रूपेश तनपुरे, संपत थोरात, देवीदास ठुबे, किशोर पटारे, चंद्रकांत ठुबे, बाबुलाल पठाण, माधन पिले, किशोर पटारे, दत्ताञय चोथे, सोमनाथ थोरात, वसंत आढाव, आण्णासाहेब पोटे, बाबासाहेब थोरात, विलास थोरात, अक्षय पोटे, अमोल थोरात, गोवर्धन पोटे, फिरोज शेख, भिमराज आढाव, यासीन शेख, आकाश पोटे आदि शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com