शेतकर्‍याची मुलगी झाली वाहन निरीक्षक

शेतकर्‍याची मुलगी झाली वाहन निरीक्षक

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत वैजापूर तालुक्यातील लाखगंगा येथील रुपाली बाबासाहेब तुरकणे या सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने घवघवीत यश संपादन करून सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे. ग्रामीण भागातील छोट्याशा खेडेगावातून रुपालीने या पदापर्यंत मारलेली मजल निश्चितच कौतुकास्पद आहे, असे मत श्री गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे यांनी व्यक्त केले.

रुपाली तुरकणे ही वैजापूर तालुक्यातील लाखगंगा येथील शेतकरी कुटुंबातील तरुणी आहे. रुपालीचे प्राथमिक शिक्षण गावात तर माध्यमिक शिक्षण पुणतांबा येथे आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण कोपरगाव येथे झाले. श्रीगणेश कोचिंग क्लास, कोपरगाव यांच्या मदतीने 12 वी विज्ञानमध्ये भरघोस गुण मिळवून पुढील शिक्षण तिने पुणे येथे अभियांत्रिकी पदवी घेतली व एका नामांकित कंपनीत नोकरीही मिळवली. परंतु यावर ती समाधानी नव्हती. त्यामुळे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नशीब आजमावयाला सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात ती उत्तीर्ण झाली.

यावेळी प्रा.प्रशांत पलघडमल, प्रा. भरत पवार हे उपस्थित होते. जिद्द आणि मेहनतीने सर्व काही साध्य करता येते, यासाठी श्रीगणेश कोचिंग क्लासेसचे संस्थापक प्रा. विजय शेटे व इतर प्राध्यापक वर्ग यांचे सहकार्य मिळाले, असे रुपाली हिने सांगितले.

Related Stories

No stories found.