कर्जबाजारीपणामुळे शेतकर्‍यांची आत्महत्या

कर्जबाजारीपणामुळे शेतकर्‍यांची आत्महत्या

करंजी (वार्ताहर)

कर्जबाजारीपणाला कंटाळून एका युवा शेतकऱ्याने घरासमोरील पडवीत गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याने मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पाथर्डी तालुक्यातील वैजूबाभळगाव येथील शेतकरी राजू आसाराम घोरपडे वय वर्ष 42 यांनी सोमवारी रात्री घरासमोरील पडवीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

याबाबत पाथर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. राजू घोरपडे यांनी वैजू बाभळगाव सेवा संस्थेसह, बँका व खाजगी फायनान्स कंपन्यांचे देखील कर्ज घेतले होते गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेली करोना महामारी व नैसर्गिक आपत्तीमुळे घोरपडे यांना कर्जाचे हप्ते वेळेवर फेडणे शक्य झाले नाही. त्यामुळे संबंधितांकडून कर्ज वसुलीसाठी घोरपडे यांच्याकडे वारंवार तागदा होत असल्याचे घोरपडे यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.

त्यानंतर सोमवारी रात्री दोरीने गळफास घेतला व आपले जीवन संपवले. घरातील कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना नगरच्या सरकारी रुग्णात हलवले, परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता. दुसऱ्या दिवशी उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा मृत्यदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई,वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. घोरपडे यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.