संगमनेर शेतकी संघाचा गुणवत्तेतून राज्यात प्रथम क्रमांक

शेतकी सहकारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे गौरवोद्गार
संगमनेर शेतकी संघाचा गुणवत्तेतून राज्यात प्रथम क्रमांक

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात (Sahakar Maharshi Bhausaheb Thorat) यांनी तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी यांच्या मदती करता उभ्या केलेल्या सर्व सहकारी संस्था नामदार बाळासाहेब थोरात (Namdar Balasaheb Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्शवत काम करत आहेत. राज्यातील बहुतांश शेतकी संघ मोडकळीस आले असताना संगमनेरचा (sangamner) शेतकी संघ हा दिमाखात उभा असून राज्यात प्रथम क्रमांकाचा ठरला असल्याचे गौरवाद्गार नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे (MLA Dr. Sudhir Tambe) यांनी काढले आहेत.

कारखाना कार्यस्थळावर संगमनेर शेतकी सहकारी संघाच्या 62 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, शेतकी संघाचे उपाध्यक्ष संपतराव डोंगरे, ज्येष्ठ नेते बाजीराव पा. खेमनर, रणजितसिंह देशमुख, शंकराव पा. खेमनर, इंद्रजीत थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, लक्ष्मणराव कुटे, गणपतराव सांगळे, संतोष हासे, शेतकी संघाचे संचालक रंगनाथ फापाळे, अर्जुन घुले, सुनील कडलग, आत्माराम हासे, रामभाऊ कडलग, राम तांबे, साहेबराव बारवे, किसन वाळके, मॅनेजर अनिल थोरात आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेरच्या सहकाराचा पाया घातला. राज्यातील अनेक शेतकी संघ मोडकळीस आले आहे. मात्र संगमनेरचा शेतकी संघ अशा अडचणीच्या काळात दिमाखात उभा आहे. केंद्र सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. मात्र शेतकी संघ व सहकाराच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मदत करण्याचे काम सातत्याने संगमनेर तालुक्यात होत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) म्हणाले की, शेतकी संघाच्या वाटचालीत जुन्या पिढीतील नेत्यांनी मोठे योगदान दिले आहे. ही संस्था सर्व सहकारी संस्थांची मातृसंस्था असून कारखान्याची शेअर्स गोळा करण्याचे काम शेतकी संघाच्या ऑफिस मधून झाले आहे. काटकसर हे शेतकी संघाचे वैशिष्ट्य राहिले असून आगामी काळामध्ये शेतकी संघाने सीएनजी गॅस (CNG Gas), इलेक्ट्रिक वाहनांची सुविधेसाठी काम करण्यासाठी नवीन ध्येय धोरण राबवणे गरजेचे आहे. गुणवत्ता व चांगल्या कामामुळे शेतकी संघाचा लौकिक असून शेतकी संघाचे पेट्रोल (Petrol) हे गुणवत्तेमुळे सर्वात जास्त विक्री होत असल्याचे ते म्हणाले.

संपतराव डोंगरे म्हणाले, नामदार बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat)

व अध्यक्ष शिवाजीराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकी संघाची वाटचाल सुरू आहे. नव्याने संगमनेर खुर्द येथे पेट्रोल पंप झाला असून तळेगाव येथे ही लवकरच पेट्रोल पंप सुरू होणार आहे. सातत्यपूर्ण गुणवत्ता हे या संघाचे वैशिष्ट्य राहिले या सर्व वाटचालीमध्ये सर्व संचालक मंडळ व अधिकारी यांचा मोठा वाटा राहिला असल्याचे ते म्हणाले.

यावेळी बापूसाहेब गिरी, बाळासाहेब उंबरकर, विलास कवडे, राजेंद्र गुंजाळ, साहेबराव गडाख, चंद्रकांत कडलग, भारत मुंगसे, रामहरी कातोरे, सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, सोमेश्वर दिवटे, सुहास आहेर, रेवजी नाना घुले, बाळासाहेब डोंगरे आदी उपस्थित होते.

या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस चे वाचन मॅनेजर अनिल थोरात यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व बी. एन. काळे यांनी केले तर किसनराव वाळके यांनी आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com