श्रीगोंद्यात शेतकऱ्यांचे आंदोलन

श्रीगोंद्यात शेतकऱ्यांचे आंदोलन

श्रीगोंदा (प्रतिनिधी)

श्रीगोंदा तालुक्यातुन जात असलेला राष्ट्रीय महामार्ग ५४८चे काम शेतकऱ्यांच्या शेतात अनधिकृतपणे केले जात असलेल्या कामाविरोधात तसेच शेतकऱ्यांच्या संमतीविना गॅस पाईपलाईनचे सुरू असलेले अनधिकृत काम तातडीने बंद करावे तसेच रस्त्याची मोजणी करूनच काम सुरू करावे यासाठी लिंपणगाव येथील शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.

संबंधित भारत गॅस रिसोर्सेस कंपनी अनधिकृत पाईपलाईनचे काम करत आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्गचे काम शेतकऱ्यांना अडचणींचे ठरत असून रस्त्याच मोजमाप झाले नाही. यासाठी १२ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. मात्र या दोन्ही कामाचे ठेकेदार आणि अधिकारी यांनी तहसीलदार यांनी दिलेले आदेश पाळले नाहीत. यात अनधिकृतपणे काम चालूं केल्याने या भागातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यलयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

उपोषणकर्त्यामध्ये सतिष कसरे, निलेश कुरूमकर, राहुल कुरूमकर, संतोष होले, शिवाजी होले, अनंत मुरकुटे, माचींद्रा शेंडगे, राजेंद्र दांगट, महादू सिदनकर यांच्यासह होलेवाडी, शेंडगेवाडी, लिपणगाव परिसरातील शेतकरी उपस्थित आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com